सतेज दणाणे - लेख सूची

पुस्तक परिचय – मढवून ठेवलेल्या समाजव्यवस्थेला सुरुंग लावणारे शरणकुमारांचे ‘अक्करमाशी’

पुस्तक परिचय पुस्तकाचे नाव : अक्करमाशी लेखक : शरणकुमार लिंबाळे प्रकाशक : दिलिपराज प्रकाशन आपल्याकडील समाजव्यवस्थेत, कुटुंबव्यवस्थेत सोज्वळतेचे रूप दिसते. ह्या व्यवस्थांमधील परंपरांच्या कप्प्यांमध्ये माणूस जगत असतो. वरून दिसणारी सोज्वळता आतून कितीही पोखरलेली असली, तरी ती दुर्लक्षून दिखाऊपणाचे तेज कायम टिकवून ठेवले जाते. ही नटवी व्यवस्था खिळखिळी कशी झालेली असते ते ‘अक्करमाशी’ ह्या आपल्या आत्मकथनात …

चित्रपट-परीक्षण : नटरंग : नाच्याच्या जीवनाची शोकांतिका

आनंद यादव यांच्या ‘नटरंग’ या ग्रामीण कादंबरीवर प्रदर्शित झालेला चित्रपट, तमाशा कलावंतांच्या जीवनाची शोकांतिका मांडतो. तमाशाकडे आजही टाकाऊ कला म्हणून पाहिले जाते. त्यात काम करणारे कलावंत उपेक्षित राहतात. त्यांची भटकंती चालूच असते. या कला व कलावंतांकडे बघण्याची दृष्टी बदलावी, असा संदेश हा चित्रपट देतो. बाळू मांगाच्या पोटी जन्मलेला गुणा हा तमाशाच्या वेडाने झपाटलेला आहे. तमाशात …